‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’, एक
प्रभावशाली ब्राह्मण संघटना म्हणुन समोर येत आहे. नुकतेच 24 एप्रिल 2012 रोजी
आपणां सर्वांच्या पाठींब्यानी तसेच सहकार्यानी ‘‘भगवान परशुराम जयंती’’ हा
कार्यक्रम धुमधडाक्यानी साजरा करण्यात आला. ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’
प्रामुख्यानी राष्ट्रीय स्तरावर ‘ब्राह्मण संघटन’ तसेच ब्राह्मण समाजाला भेडसावणार्या
समस्या व आव्हान यांचे प्रभावीपणे निराकरण करणे, याकरीता कार्यरत आहे. ब्राह्मण
समाजाचे एकत्रीकरण, सक्षमीकरण हे शाखा, उपशाखा, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन व्हावे,
असे व्यापक उद्दीष्ट असले तरी ‘‘समाजनिर्मीतीतून राष्ट्रनिर्मीती’’ हे देखील
‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे’’ ध्येय आहे. आपला समाज प्रभावशाली झालाच पाहीजे
पण त्यासोबतच राष्ट्रीय कर्तव्यदेखील कटाक्षाने पाळले गेले पाहिजे असा
अ.भा.ब्रा.म.चा दृष्टीकोन आहे. यालाच अनुसरून 14 एप्रिल रोजी संविधानकार भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 124व्या जयंती निमीत्तानी अखिल भारतीय ब्राह्मण
महासंघाच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानकार भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. संपूर्ण
देशाला एकसुत्रात गुंफले. आज जगभरात भारतीय लोकशाहीचा जो नावलौकिक आहे त्याचे
श्रेय या संविधानाला आहे. संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे ऋण
एक भारतीय नागरिक म्हणुन आपण मानायलाच हवे. ज्या ज्या व्यक्तींनी या देशाकरीता
भरीव कार्य केले आहे, त्यांचा योग्य वेळी यथोचित सन्मान व्हावा, यावर आमचा भर
असेल. समाजकारण करीत असताना राष्ट्रकार्य दुर्लक्षित होता कामा नये. आज सर्व
जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे समाजशत्रू
डोके वर काढीत असताना आपल्या वैचारिक प्रगल्लभतेनी यावर मात करण्याकरीता,
सामाजिक समरसता निर्माण होण्याकरिता ब्राह्मण समाजानी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
देशभरात विखुरलेला ब्राह्मण जर एक झाला तर काय होऊ शकेल, याची एक झलक काही
दिवसांपुर्वी बघावयास मिळाली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या
पार्श्वभूमीवर झालेल्या कॉंग्रेस (आय) पक्षाच्या चिंतन बैठकीत पक्षाचे महासचिव
श्री.राहुल गांधी यांनी ‘‘मी ब्राह्मण आणि कॉंग्रेसचा महासचिव आहे’’, असे विधान
केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानी तात्काळ श्री. गांधी यांच्याकडे याचा खुलासा
मागितला. या देशातील कोणताही नागरिक ‘मी ब्राह्मण आहे’ किंवा ‘मी ब्राह्मणत्व
स्विकारतो’ असे म्हणत असेल तर आमचा त्याला कोणताच आक्षेप नाही किंबहूना ब्राह्मण
समाज त्याचे स्वागतच करेल. परंतू, निव्वळ राजकीय लोकप्रियता मिळविण्याकरीता,
राजकीय लाभाकरीता कोणी नेता ‘‘मी ब्राह्मण आहे’’, असे विधान करीत असेल त्याला जाब
विचारला जाईल. तो नेता ब्राह्मण असला तरीही त्यानी ब्राह्मण समाजाकरीता काय कार्य
केले आहे याचा खुलासा केला पाहीजे. राजकीय लाभ उपटणार्या अशा विधानांनी हुरळुन न
जाता आपण याचा वस्तुनिष्ठ्पणे विचार करायला हवा. ‘‘ब्राह्मण’’ अथवा
‘‘ब्राह्मणत्व’’ हा अस्मितेचा मुद्दा आहे, या मुद्यावरून केलेले राजकारण ‘‘अखिल
भारतीय ब्राह्मण महासंघ’’ कदापि सहन करणार नाही.
येत्या काही महिन्यांत ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ काही महत्वकांक्षी
प्रकल्प राबविण्याची योजना आखीत आहे. त्या त्या वेळी कार्यक्रमांची घोषणा करण्यात
येईल. आजपावेतो अ.भा.ब्रा.महासंघाच्या कार्याला आपण जसे सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य
या कार्यक्रमांनाही लाभेल अशी अपेक्षा
आहे. धन्यवाद !