दिड ते दोन शतकांपुर्वी समाजात सर्वात जास्त आदर असलेला ब्राह्मण, गेली काही दशके प्रागतिकदृष्ट्या रसातळाला जातो आहे. समाजात सर्वाधिक मान असलेला ब्राह्मण आज उपहासाचा विषय ठरतो आहे. पेशव्यांचा, क्रांतीकारकांचा वारसा असलेला ब्राह्मण आज समाजशत्रुंच्या वैचारिक हल्ल्याचा बळी ठरतो आहे. समृध्द आणि सशक्त असलेला हा ब्राह्मण सरकारी यंत्रणेची उपेक्षा सहन करतो आहे. ब्राह्मण असंघटीत असणे, हे एकमेव कारण यामागे आहे. देशाच्या एकुण लोकसंख्येच्या केवळ काही टक्केच असलेला हा समाज आपल्यातील शाखा-उपशाखा, प्रांत, भाषा यामुळे अजुनच जास्त विखुरला आहे. आपले गतवैभव पुनः प्राप्त करण्यासाठी ही सर्व ‘‘ब्रहमशक्ती’’ एकत्रित करणे, संघटीत करणे अत्यंत आवश्यक आहे. काळाची ही गरज लक्षात घेऊन मा.श्री.गोविंदजी कुलकर्णी यांनीआदरणीय पं.वसंतराव गाडगीळ यांच्या प्रेरणेतुन महत्वकांक्षी योजना आखली. ‘‘ब्राह्मण जोडो अभियान’’ हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर राबवण्याचा निर्णय मा.श्री.गोविंदजी कुलकर्णी यांनी घेतला. ‘‘ब्राह्मण जोडो अभियान’’ हा महत्वकांक्षी प्रकल्प उत्तमरितीने कार्यान्वित व्हावा, याकरिता संघटन बांधणी (संघटना), सामाजिक माध्यम (सोशल नेटवर्कींग), मुद्रित माध्यम (प्रिंट मिडीया) अशा विविध माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कार्याची व्यापकता व गरज लक्षात घेऊन तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रकर्षाने जाणवत असलेली ब्राह्मण संघटनेची उणीव भरुन काढण्याकरीता ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ या राष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. युवकांना आपले हक्काचे व्यासपीठ असावे या दृष्टीकोनातुन ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (युवा आघाडी)’’ स्थापन करण्यात आली. आजच्या जागतिकीकरणाच्या लाटेत ब्राह्मण आपल्या मुळ प्राचीन मुल्य व मुळ संस्कृतीपासुन दुरावतो आहे आणि हेच आज ब्राह्मणांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचे कारण आहे. आजच्या युवा पिढीमधे हे संस्कार पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्याकरीता सामाजिक माध्यम (सोशल नेटवर्कींग) चा लाभ घेत युवा वर्गात मिसळुन, त्यांच्याशी संवाद साधुन, त्यांचे प्रश्न जाणुन ते सोडविण्याकरीता संघटना प्रयत्नशील आहे. युवकांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम संघटना करीत आहे.
‘‘संध्यारुपी’’ ज्ञानासोबतच ‘‘संगणकरुपी’’ विज्ञानाची कास धरुन पुढील पिढीला ज्ञानाचे अधिष्ठान देण्यास आम्ही कटिबध्द आहोत. आपल्या उद्देशाला अनुसरुन ब्रह्मजागृती प्रकाशनाच्या माध्यमातुन ‘‘ब्रह्मकेसरी’’ या मासिकाची सुरुवात केली. आगामी काळात योजण्यात येत असलेले कार्यक्रम, संघटनेचे धोरण याविषयी वैचारिक देवाण-घेवाण व सुसंवाद साधण्याकरीता या माध्यमाचा निश्चितच उपयोग होईल. या मासिकात मान्यवरांचे संस्कारक्षम लेख, आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक माहितीनी परिपुर्ण लेख व वर्तमान परिस्थितीतील ब्राह्मणांविषयीचे लेख यांचा समावेश असेल. याशिवाय संपुर्ण देशातील ब्राह्मण संघटना व त्यांची कार्याची माहिती, नोकरी तसेच व्यवसाय मार्गदर्शन, वधू-वर सूचक केंद्रे व त्यांची माहिती याचाही या मासिकात समावेश असेल.
‘‘ब्रह्मकेसरी’’ या माध्यमातुन आज आपल्यापर्यंत पोहचत आहोत, याचा अतिशय आनंद आहे.
‘‘ब्राह्मण जोडो अभियान’’ हा अत्यंत महत्वकांक्षी तसेच खर्चिक प्रकल्प असुन, ‘स्वाभिमानी आणि भयमुक्त समाजनिर्मीती’ हे या प्रकल्पाचे ध्येय आहे. आम्ही आवाहन करतो की, हे प्रचंड शिवधनुष्य पेलायला सर्व ज्ञाती बांधवांनी एकत्र येत आपली आर्थिक, बौध्दीक तसेच शारिरिक शक्ती संघटनेच्या मागे उभी करावी व आपआपल्यापरीने या कार्याला सहाय्य करावे. आपणा सर्वांच्या सहकार्यानी तसेच पाठींब्यानी आज अवघड वाटणारे हे शिवधनुष्य सहज साध्य करु शकु असा विश्वास वाटतो.



